बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर साकारल्या जाणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. यासाठी ती गेल्या काही दिवसांपासून सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षणही घेत आहे. मात्र, आता एका वेगळ्याच कारणामुळे या चित्रपटाच्या वाटेत अडथळा आला आहे. या अडथळ्यांमुळे चित्रीकरणाच्या वेळापत्रकाला विलंब होत असल्याने श्रद्धाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड होणार असल्याची चर्चा आहे. किंबहुना चित्रपटाच्या निर्मात्यांमी श्रद्धाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्याचा वचार केल्याची माहिती ‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिली आहे.२०१७ हे वर्ष ‘आशिकी’ गर्ल श्रद्धासाठी फार काही खास ठरलं नाही. त्यातच आता २०१८ची सुरुवातही तिच्यासाठी विशेष नाही असंच चित्र दिसून येत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews